कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मनात बरेच पडसाद उमटत आहेत.
देवापुढे हात जोडले की आपसूक पसायदान मुखी येतंय. विश्वशांतीचं जे हे उत्कट काव्य माउलींनी आपणा सर्वांसाठी रचलं त्याला हात घालायची माझी पात्रता नाही. हे
लिहिण्याचा प्रयत्न केलाय तो केवळ सद्भावना पोहोचवण्यासाठी, सर्वासाठी "आरोग्य आणि स्वास्थ्य" मागण्यासाठी !
आरोग्याचे पसायदान
आता विश्वात्मके देवे । येणे आरोग्ये रक्षावे ।
रक्षोनि मज द्यावे । जीवनदान हे ।।
व्याकूळांची संकटे पांगो | आता संसर्गे गती थांबो |
धुता करस्पर्शे हटो | गोत्र भयाचे ||
कोरोनाचे तिमिर जावो | विश्व निसर्ग धर्मे जागो |
जो जे जाणिल तो ते सांगो | भविष्यात ||
कष्टती डॉक्टर मंडळी | परिचारिकांची मांदियाळी |
अविरत पोलीस सांगाती | धावती आता ||
चला संकल्पू घरी राहावं | पेटवू नये अफवांचे
गाव |
बोलती जे उद्धव | फायद्याचे ||
ज्ञानदेचे वार्तांकन | विनाखंड जे रात्रंदिन |
ते मीडियाचे धीर सज्जन | सोयरे होती ||
किंबहुना सर्व निरोगी | स्वस्थ राहोनी तिन्ही लोकी |
साधुया सारी प्रगती | संतुलित ||
आणि मानवाच्याही पुढे | विशेष ही पृथ्वी असे |
इष्टारिष्ट ठरवे | बापुडी ती ||
येथ बळे दृढनिश्चयेची राहो | हा होईल रोग बरा हो |
येणे ठरे धैर्यवान जो | सुखिया झाला ||
मूळ पसायदान : संत ज्ञानेश्वर
नव रुपांतर : प्राजक्ता गव्हाणे
दिग्दर्शन : रोहन सदाशिव शिंगाडे
Video of "पसायदान आरोग्याचे" is available on :
मराठीतील प्रसिद्ध सुलेखनकार म्हणजे माझा मित्र शिरीष चव्हाण, याने जेव्हा हे पसायदान वाचले तेव्हा "आपण याचे सुलेखन लगेच करूया" ही उत्स्फूर्त दाद दिली. उभा दिवस खर्ची घालून दोन तीनदा हे "आरोग्याचे पसायदान" एकटाकी लिहून काढले, शिरीषचे कोरीव अक्षर एवढे एवढे सुरेख आहे की सुरुवातीला मला वाटे की हा एखादा रेडिमेड फॉन्टच असावा पण सत्य हे आहे की शिरीषच्या सिद्धहस्ताने उमटलेली ती प्रमाणबद्ध अफाट देखणी वळणदार अक्षरं आहेत, जी आता मराठीकडे लोकांचं लक्ष वेधून घेणारी सुलिखित अक्षरलेणी ठरताहेत. स्वतःचा वेगळा स्वभाव प्रकट करणाऱ्या, अर्थाचा गाभा अधिक समृद्ध करणाऱ्या, कलागणेशाला प्रसन्न करून घेणाऱ्या या अक्षरांनी नटलेलं पसायदान त्याच्या अक्षरातही नक्की वाचा! शिरीषने चालवलेला अविरत अक्षरयज्ञ याची देही याची डोळा पाहायचा असेल तर एकदा त्याच्या पेज वर फेरफटका मारून या :
https://m.facebook.com/ Calligraphyenthusiast_- 797588643909185/?tsid=0. 9863671741752337&source=result
सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे, सर्वासाठी "आरोग्य आणि स्वास्थ्य" मागणारे, जगण्याला बळ देणारे, ‘आपण हा लढा जिंकूच’ हा ठाम विश्वास देणारे हे “पसायदान आरोग्याचे” एकदा नक्की ऐका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा