मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

आरोग्याचे पसायदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मनात बरेच पडसाद उमटत आहेत. देवापुढे हात जोडले की आपसूक पसायदान मुखी येतंय. विश्वशांतीचं जे हे उत्कट काव्य माउलींनी आपणा सर्वांसाठी रचलं त्याला हात घालायची माझी पात्रता नाही. हे लिहिण्याचा प्रयत्न केलाय तो केवळ सद्भावना पोहोचवण्यासाठी, सर्वासाठी "आरोग्य आणि स्वास्थ्य" मागण्यासाठी ! 

आरोग्याचे पसायदान

आता विश्वात्मके देवे । येणे आरोग्ये रक्षावे ।
रक्षोनि मज द्यावे । जीवनदान हे ।।


व्याकूळांची संकटे पांगो | आता संसर्गे गती थांबो |
धुता करस्पर्शे हटो | गोत्र भयाचे ||


कोरोनाचे तिमिर जावो | विश्व निसर्ग धर्मे जागो |
जो जे जाणिल तो ते सांगो | भविष्यात ||


कष्टती डॉक्टर मंडळी | परिचारिकांची मांदियाळी |
अविरत पोलीस सांगाती | धावती आता ||


चला संकल्पू घरी राहावं |  पेटवू नये अफवांचे गाव |
बोलती जे उद्धव | फायद्याचे ||


ज्ञानदेचे वार्तांकन | विनाखंड जे रात्रंदिन |
ते मीडियाचे धीर सज्जन | सोयरे होती ||


किंबहुना सर्व निरोगी | स्वस्थ राहोनी तिन्ही लोकी |
साधुया सारी प्रगती | संतुलित ||


आणि मानवाच्याही पुढे | विशेष ही पृथ्वी असे |
इष्टारिष्ट ठरवे | बापुडी ती ||


येथ बळे दृढनिश्चयेची राहो | हा होईल रोग बरा हो |
येणे ठरे धैर्यवान जो | सुखिया झाला ||



मूळ पसायदान : संत ज्ञानेश्वर
नव रुपांतर : प्राजक्ता गव्हाणे
गायन : रुपाली मोघे
दिग्दर्शन : रोहन सदाशिव शिंगाडे

Video of "पसायदान आरोग्याचे" is available on : 



मराठीतील प्रसिद्ध सुलेखनकार म्हणजे माझा मित्र शिरीष चव्हाण, याने जेव्हा हे पसायदान वाचले तेव्हा "आपण याचे सुलेखन लगेच करूया" ही उत्स्फूर्त दाद दिली. उभा दिवस खर्ची घालून दोन तीनदा हे "आरोग्याचे पसायदान" एकटाकी लिहून काढले, शिरीषचे कोरीव अक्षर एवढे एवढे सुरेख आहे की सुरुवातीला मला वाटे की हा एखादा रेडिमेड फॉन्टच असावा पण सत्य हे आहे की शिरीषच्या सिद्धहस्ताने उमटलेली ती प्रमाणबद्ध अफाट देखणी वळणदार अक्षरं आहेत, जी आता मराठीकडे लोकांचं लक्ष वेधून घेणारी सुलिखित अक्षरलेणी ठरताहेत. स्वतःचा वेगळा स्वभाव प्रकट करणाऱ्या, अर्थाचा गाभा अधिक समृद्ध करणाऱ्या, कलागणेशाला प्रसन्न करून घेणाऱ्या या अक्षरांनी नटलेलं पसायदान त्याच्या अक्षरातही नक्की वाचा! शिरीषने चालवलेला अविरत अक्षरयज्ञ याची देही याची डोळा पाहायचा असेल तर एकदा त्याच्या पेज वर फेरफटका मारून या : 



सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे, सर्वासाठी "आरोग्य आणि स्वास्थ्य" मागणारे, जगण्याला बळ देणारे, ‘आपण हा लढा जिंकूच’ हा ठाम विश्वास देणारे हे “पसायदान आरोग्याचे” एकदा नक्की ऐका.







माझं शहर माझा अभिमान


पवनेचे हे तूफान उठले

ऊठ ऊठ मोरयाच्या नगरीत
उद्यमशीला पुढे.. उद्यमशीला पुढे..
पवनेचे हे तूफान उठले
उठले मावळकडे
हो उठले मावळकडे

हीच नगरी जिने पाहिली अलंकापुरी वसताना
ज्ञानेशांनी वेद वदवले महिषमुखाने जगताला
मोरया गोसाव्यांचे पाऊल या धरतीवर पडे
पवनेचे हे तूफान उठले
उठले मावळकडे
हो उठले मावळकडे

अभंगांतूनी दंग तुकोबा भंडाऱ्यावरती
संत महंतां भवती तरली इंद्रायणीची महती
शिवबाही नतमस्तक जाहले त्या भक्तिपुढती
इंद्रायणीतून गाथा उठली
उठले वारकरी
हो उठले वारकरी

शिवबाचा पराक्रम लई मोठा ! त्यात मावळमुलुखाचा वाटा !!
भुईकोटाला बी नसे इथं तोटा ! हां ..हां भुईकोटाला नसे इथं तोटा !
चाकणचा किल्ला तसा छोटा ..
पडला शायीस्तेखानाचा त्याला वेढा !
बघा संग्रामदुर्गाच्याभवती ! शत्रू वीस हजारावरती ..
तरी लढले फिरंगोजी नरसाळे .. सवे फक्त तीनशेवीस मावळे
छपन्न दिस ते युद्ध चालले .. बात स्वराज्याची
अन शत्रूलाही धूळ चारण्या साथ या नगरीची
हां.. पवनेचे ते तूफान उठले… पवित्र इथली धरती
हां.. जी ..जी जी .. जी .. जी ..
अन पराक्रमाला पूज्य मानूनी मावळकडे उठती
हां.. जी ..जी जी .. जी .. जी ..

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना प्राणाहूनही प्यारा
त्या चापेकर बंधूनी तो ब्रिटीश व्यूह भेदला
काळरात्री धाडीले रँडला यमसदनाच्या कडे
पवनेचे हे तूफान उठले
उठले मावळकडे
हो उठले मावळकडे

उद्योगांना दिशा दाखवी पवनाथडीची नगरी
गगनावरती इमले रचते कणखर इथली धरती
प्रगतीचे हे प्रचंड गारुड वसले शहरापुढे
पवनेचे हे तूफान उठले
उठले मावळकडे
हो उठले मावळकडे

पुण्यनगरी मायानगरी
रस्ते आमचे जोडतात
पिंपरी चिंचवड मार्गे
लोकं स्वप्नांमागे धावतात
आखीव रेखीव रस्त्यांनाही
निसर्गाचं भान आहे
आय टीवाली हिंजवडी तर
खास आमची शान आहे
एमाय डी सी म्हणू नका
फार्मा बीरमा मोजू नका
कार वाल्या ऑटोमोबाईलच्या
गिणतीलाही बसू नका
खूप खूप कंपन्यांचे
ढीगभर जॉब्स आहेत
नाही भरलं पोट तरी 
निदान छोटे शॉप्स आहेत
पोटाच्या पाण्याला
पाण्याच्या प्रश्नाला
प्रश्नाच्या नाण्याला
इथे एकच उत्तर
राडे रोडे कितीकितीही झाले
तरी नगरपालिका तत्पर
हां महानगरपालिका तत्पर
PCMC Corporation
सॅल्यूट हो
आण बाण शान आमची कॉर्पोरेशन
सॅल्यूट हो

दुर्गा टेकडी
भक्ती शक्ती
सायन्स पार्क
बोट क्लब
प्रेक्षागृह रंगमंदीरं
मॉल्सवाले शॉपिंग ह्ब्स
खाणाऱ्यांची फिरणाऱ्यांची 
पुरेपूर चंगळ
नाट्य संगीत मंडळींची
मस्तवाली दंगल
इथे सारे देतात प्रोत्साहन
हां हां सारे देतात प्रोत्साहन
कारण प्रत्येकाला दर्द आहे
तमाशाचे सिनेमाचे
थोडे थोडे कर्ज आहे
ना मुंबईचा ना पुण्याचा
ना चंद्राचा ना इंद्राचा
गंडा बांधल्या बंद्याचा
ना गंड्यावाल्या धंद्याचा
कलाकार इथला पिंपरी चिंचवडचा आहे
हॅरीस पासून पॅरीस त्याचे
लोणावळ्याला बॉण्ड्री आहे
कलाकार
हो हो इथला कलाकार

ट्रेन घ्या मेट्रो घ्या
रेट्रोवाली बस घ्या
फास्ट फास्ट सिटीतला या
कुठलापण कोपरा घ्या
छोकरा घ्या छोकरी घ्या
नवरा बायकोची नोकरी घ्या
सात नंतर चालणारी
कुठलीपण टपरी घ्या
इकडे सगळं सेफ आहे
इकडे लोक नेक आहेत
जात पात सब झूट
इकडे सगळे एक आहेत
हो हो इकडे सगळे एक आहेत
We are PCMC
We are PCMC

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यनुकोटीं
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

-    प्राजक्ता गव्हाणे

फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...